ganpati
ganpati 
छत्रपती संभाजीनगर

गणरायाच्या मूर्तीचा स्टॉल लावण्यापूर्वी हा नियम बंधनकारक... 

माधव इतबारे

औरंगाबाद : गणेशोत्सवात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून मार्केटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तीनऐवजी आठ भागांत मार्केट भरविले जाणार आहे. बुधवारी (ता. १२) मार्केटच्या जागा अंतिम करण्यात आल्या. तसेच ज्या विक्रेत्यांना गणेशमुर्ती किंवा इतर साहित्य विक्रीचा स्टॉल लावायचा आहे, त्यांना अॅन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. नागरिकांना मात्र इच्छेनुसार चाचणी करण्याची मुभा असेल. 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदान तर सिडको भागात दोन ठिकाणी मूर्ती विक्री केल्या जात होत्या. त्यासोबतच डेकोरेशन, पूजेचे साहित्य विक्री करणारी दुकानेदेखील मोठ्या संख्येने थाटली जातात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात प्रत्येकी एक मार्केट उभारण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी जाहीर केला होता. त्यानुसार बुधवारी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत जागा निश्चित करण्यात आल्या.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

याठिकाणी असेल मार्केट 
जिल्हा परिषद मैदानासह टीव्ही सेंटरजवळील क्रीडा संकुल, सिडको एन-पाच येथील राजीव गांधी मैदान, उल्कानगरी येथील खिंवसरा पार्क मैदान, कामगार चौक ते महालक्ष्मी चौक सिडको एन-दोनदरम्यानच्या स्टेडियमच्या बाजूची जागा, श्रीहरी पॅव्हेलियन, प्रोझोन मॉलसमोरील फूटपाथ या जागांचा समावेश आहे. कर्णपुरा मैदानावरही मार्केट भरवण्याचे महापालिकेचे नियोजन असून, याबाबत चर्चा सुरू आहे. 

संसर्ग टाळण्यासाठी चाचणी करावीच लागेल 
गर्दीच्या ठिकाणाहून कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून, गणेशमूर्तींचे स्टॉल लावणाऱ्या विक्रेत्याला अँटीजेन चाचणी सक्तीची केली जाणार आहे. या टेस्टमध्ये जे विक्रेते निगेटिव्ह येतील त्यांना दुकान थाटण्याची परवानगी दिली जाणार आहे, तर ग्राहकांसाठी इच्छा असेल तर चाचणी करण्याची मुभा आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

२६२१ अँटीजेन, ९७ जण पॉझिटिव्ह 
महापालिकेने बुधवारी (ता. १२) दिवसभरात २६२१ जणांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ९७ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. शहराच्या सहा एंट्री पॉइंटवर १८३० जणांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५५ जण पॉझिटिव्ह आले. १३ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये मिळून १२७ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. मोबाईल पथकांच्या माध्यमातून ७९१ जणांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४२ जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT